Ad will apear here
Next
कुटुंब दिनानिमित्त दोन कविता : ‘ते माझे घर’ आणि ‘घर असावे घरासारखे’..


१५ मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या परिस्थितीत कुटुंबाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, घर म्हणजेच कुटुंब ही संकल्पना नेमकेपणाने उलगडून सांगणाऱ्या दोन कविता प्रसिद्ध करत आहोत. श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची ‘ते माझे घर’ आणि विमल लिमये यांची ‘घर असावे घरासारखे’ या कविता प्रत्येकाने जरूर चिंतन करण्यासारख्या आहेत... 
.......
ते माझे घर....

ते माझे घर! ते माझे घर! ।।ध्रु.।।

आजी आजोबा वडील आई
लेकरांसवे कुशीत घेई
आनंदाचा बरसे जलधर! ते माझे घर! ।।१।।

कुठेहि जावे हृदयी असते
ओढ लावते, वाट पाहते,
प्रेमपाश हा अतीव सुखकर! ते माझे घर! ।।२।।

भिंती खिडक्या दारे नच घर
छप्पर सुंदर तेही नच घर
माणुसकीचे लावी अत्तर! ते माझे घर! ।।३।।

परस्परांना जाणत जाणत
मी माझे हे विसरत, विसरत
समंजसपणा समूर्त सुंदर! ते माझे घर! ।।४।।

मन मुरडावे, जुळते घ्यावे
सुख दुःखाना वाटुन घ्यावे
भोजन जिथले प्रसाद रुचकर! ते माझे घर! ।।५।।

ज्योत दिव्याची मंद तेवते
शुभं करोति संथ चालते
श्रीरामाची ज्यावर पाखर! ते माझे घर! ।।६।।

बलसंपादन गुणसंवर्धन
धार्मिकतेची सोपी शिकवण
अनौपचारिक शाळा सुंदर! ते माझे घर! ।।७।।

- श्रीराम बाळकृष्ण आठवले
(श्रीराम बाळकृष्ण आठवले यांचे साहित्य https://shribaathavalesliterature.blogspot.com/ येथे वाचता येईल.)
...........
घर असावे घरासारखे
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती

त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी

त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी
अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी

या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती
- विमल लिमये



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZSYCM
Similar Posts
स्वरलतेचं शब्दचित्र... (शब्द आईचे, चित्र लेकीचं...) २८ सप्टेंबर २०२० रोजी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ९२व्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने, त्यांच्याबद्दलचे हे शब्द-चित्र... माय-लेकीनं काढलेलं...
‘सारे जहाँसे अच्छा...’चे गीतकार मोहम्मद इक्बाल मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्ताँ हमारा! सारे जहाँसे अच्छा हिन्दोस्ताँ हमारा!!! या मधुर गीताचे लेखक मोहम्मद इक्बाल यांचा नऊ नोव्हेंबर हा जन्मदिन.
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
रेने गॉसिनी आपल्या अॅस्टेरिक्स कॉमिक्समुळे जगभरच्या आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा फ्रेंच लेखक रेने गॉसिनी याचा १४ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language